Farmers Protest : ३७८ दिवसांनंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन स्थगित

११ डिसेंबरपासून आंदोलक दिल्ली सीमेवरून परतणार
Farmers Protest : ३७८ दिवसांनंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलन स्थगित

दिल्ली l Delhi

दिल्लीतून एक मोठी बातमी येत असून गेल्या ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) स्थगित करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली.

केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

आम्ही मोठ्या विजयासह जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील.

दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रितसर पत्र पाठवलं असून, त्यात सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांवरील खटले मागे (Cases Against Farmers) घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे.

तसेच, जाळपोळ कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. याशिवाय आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात येणार आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने यापूर्वीच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या जाहीर केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com