संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रद्द

शहीद दिनी देशभरात मोर्चे काढणार
संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रद्द

नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या देन महिन्यांपासून शेतकर्‍यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता बजेटच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

भारतीय किसान युनियनचे बलबिरसिंग राजेवाल म्हणाले, प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर आता 1 फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आंदोलनांतर्गंत शहीद दिनी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com