नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू असून आज सर्वोच्च न्यायालयात सलग दुसर्या दिवशी या

विषयावर सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. त्यावर आज चित्र स्पष्ट होऊ शकते. दुसरीकडे, थंडीतही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठीय्या मांडून बसले आहेत. दरम्यान, बुधवारी संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज शेतकरी आंदोलनावर पुन्हा एकदा सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले 21 दिवस आंदोलन करत आहेत. शेतकरी त्यांच्या मागण्यांवरुन मागे हटायला तयार नाही आहेत. आज शेतकर्यांच्या आंदोलनाचा 22 वा दिवस आहे. शेतकर्यांनी दिल्लीला जाणारे रस्ते अडवून धरले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना रस्त्यांवरुन हटवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. बुधवारी संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली, त्यानंतर वातावरण तापले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींसह इतर नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आजही शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे भाजप किसान संमेलनातून शेतकर्यांना कायदा समजवण्यात व्यस्त आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बरेलीतील शेतकर्यांना संबोधित करतील.