M. S. Swaminathan : 'हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

M. S. Swaminathan : 'हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

मुंबई | Mumbai

स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक (India Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन (Dr.M.S.Swaminathan) यांचे आज गुरुवार (दि. २८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना नियुक्त करण्यात आले होते....

M. S. Swaminathan : 'हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन
Ganpati Visarjan 2023 : राज्यभरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म ०७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात झाला होता. त्यांनी चेन्नईमध्ये एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली होती. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मॅगसेसे पुरस्कार देखील मिळाला होता. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले. तर १९७२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते. यानंतर पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० ते ८२ या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. १९८२ ते ८८ या ७ वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक (Director General) म्हणूनही काम केले.

M. S. Swaminathan : 'हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन
Asian Games 2023 : भारताचा नेमबाजीत आणखी एक 'सुवर्ण'वेध; सरबजोत, अर्जुन आणि शिवाची कमाल

दरम्यान, एम.एस. स्वामीनाथन यांनी १९४९ मध्ये बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करून कारकीर्द सुरू केली. यानंतर १९६० च्या दशकात जेव्हा भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता ज्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उच्च उत्पादनाच्या जातीचे बियाणे विकसित केले. यामुळे भारतातील पारंपारिक शेतीपासून बियाणे आणि संबंधित तंत्रांच्या उच्च-उत्पादक वाणांच्या माहिती मिळण्याकडे संक्रमण झाले. त्यामुळे भारतात हरितक्रांती झाली आणि स्वामीनाथन यांना 'हरितक्रांतीचे जनक' म्हटले गेले. स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

M. S. Swaminathan : 'हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन
Accident News : भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com