
मुंबई | Mumbai
गेल्या काही तासात अनेक फेसबुक युझर्सच्या फॉलोवर्सची संख्या अचानक घटली होती. यात युझर्स आहेतच त्याचबरोबर खुद फेसबुकचा मालक असलेला मार्क झुकेरबर्गचही फॉलोवर्स घटले होते. मार्क झुकेरबर्गचचे फक्त ९९९३ इतकेच फॉलोवर्स राहिले होते. मात्र आता फॉलोवर्सची संख्या पुन्हा पूर्वी इतकी झाली आहे.
फेसबुकच्या एका बगमुळे रातोरात अनेकांच्या फॉलोवर्सच्या संख्येत घट झाली आहे. हे फक्त भारतातच नाहीत अमेरिकेतही अनेकांबाबतीत झालं आहे. असं पहिल्यांदाच घडत आहे. याबद्दल फेसबूक मेटाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान फेक अकाउंटच्या तक्रारींबाबत वेळोवेळी फेसबुक फेक अकाउंट काढून टाकण्यासाठी कारवाई करत असतो, ज्यामुळे लोकांचे फॉलोअर्स कमी होत राहतात. पण यावेळी कमी होणाऱ्या फॉलोअर्सची संख्या खूप मोठी होती. त्यात विशेष बाब म्हणजे प्रत्येकाचे फॉलोअर्स १० हजारांच्या खाली आले होते.