डाेनाल्ड ट्रम्प
डाेनाल्ड ट्रम्प
देश-विदेश

फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट उडवली

ट्विटरनेही केली कारवाई

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

वाशिंग्टन | Washington -

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसबाबत टाकलेली भ्रामक पोस्ट फेसबुकने उडविली आहे. Donald Trump

कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या प्रत्यय डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आला आहे.

लहान मुले कोरोना व्हायरसशी लढण्यास आधीपासूनच सक्षम असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. फॉक्स न्यूजवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. याचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. ही पोस्ट फेसबुकने डिलीट केली आहे. यावर फेसबुकने स्पष्टीकरण देताना एक गट कोरोना व्हायरसशी लढण्यास म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचा दावा करणे आमच्या पॉलिसीविरोधात आहे. अशा प्रकारची माहिती ही कोरोनासंबंधी चुकीची माहिती पसरविते. यामुळे हे पोस्ट डिलीट करण्यात येत आहे.

फेसबुकसारखीच ट्विटरनेही कारवाई केली आहे. याच पोस्टवरून ट्विटरने ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट काही काळासाठी ब्लॉक केले आहे. ट्रम्प यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. ट्विटरने ट्रम्प प्रचाराच्या अकाऊंटला हे ट्विट डिलीट करण्यास सांगितले आहे.

तोपर्यंत या अकाऊंटवरून कोणतेही नवीन ट्विट पोस्ट करता येणार नाही. अशाप्रकारचे पाऊल ट्विटर अन्य पोस्टबाबतही उचलते. यासाठी युजरला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यास सांगितले जाते. वेगवान कारवाई करण्याबाबत फेसबुक खूप मागे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com