मोठी दुर्घटना! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू

मोठी दुर्घटना! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

वायव्य चीनच्या यिनचुआन शहरात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ३१ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे...

जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी भोजनालये आणि मनोरंजनाची ठिकाणे देखील आहेत.

मोठी दुर्घटना! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू
Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; राहुल हांडोरेला मुंबईतून अटक

बुधवारी रात्री 8:40 च्या सुमारास (1240 GMT) हा स्फोट निंग्झिया स्वायत्त प्रदेशाची राजधानी यिनचुआनच्या डाउनटाउनमधील निवासी भागातील फुयांग बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये झाला. रेस्टॉरेंटमध्ये असलेल्या लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोठी दुर्घटना! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू
साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

स्फोट होण्याच्या सुमारे एक तास पूर्वी रेस्टॉरंटमधील दोन कर्मचाऱ्यांना गॅसचा वास येत होता. यानंतर गॅस टँकचा व्हॉल्व तुटल्याचं दिसून आलं. हा व्हॉल्व बदलत असतानाच स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com