वयाची अट न ठेवता ‘असे’ करा लसीकरण ; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

लॉकडाऊनआधी गरिबांच्या खात्यात सहा हजार जमा करा
वयाची अट न ठेवता ‘असे’ करा लसीकरण ; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली -

करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वयाची अट न ठेवता गरजेनुसार लसीकरण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

तसेच काही राज्यांमध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याने उत्पादनवाढीवर भर द्यावा, राज्यांना संसर्गाची स्थिती व पुढील अंदाजानुसार लस उपलब्ध करुन देण्यात यावी. असेही त्यांनी सोमवारी (12 एप्रिल) लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. पण असे करताना प्रत्येक गरिबांच्या खात्यात सहा हजार जमा करा, योग्य पात्रता असलेल्या सर्व पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोना संबंधीत सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा कोरोनासंबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करावा.

सध्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरसह रेमडेसिवीर आणि इतर औषधांवरही जीएसटी कर घेतला जात होता. योग्य पात्रता असलेल्या सर्व पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या तसेच स्थलांतरित मजुर, कामगारांच्या मदतीसाठी देखील सरकारने योग्य ती पाऊले उचलावीत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com