आधार कार्ड नसेल तरी मिळणार सरकारी योजनांचा फायदा

आधार कार्ड नसेल तरी मिळणार सरकारी योजनांचा फायदा

नवी दिल्ली - करोना काळात कोणीही फक्त आधार कार्ड नाही म्हणून, सरकारी योजनांपासून वंचित राहणार नाही असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. करोना संकटात देण्यात येणार्‍या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य नसणार आहे.

ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांनाही सेवा आणि सरकारी योजनांचा फायदा घेता येणार आहे. दरम्यान, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्याचं कारण पुढे अनेक रेशन कार्ड रद्द करण्यात आली होती.

यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयामुळे गरीबांना उपासमारीच्या संकटाला सामोरं जाव लागत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. सुनावणीत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि सर्व राज्यांकडून चार आठवड्यात उत्तर मागितलं होतं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com