ऊसाचा रस व बी हेवी मोलासेसपासून इथेनॉल निर्मिती ठरणार साखर उद्योगाला वरदान

ऊसापासून साखर निर्मिती करणे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण भारत देश आणि महाराष्ट्र राज्यातील साखर साखर उद्योगाची वाटचाल सुरू आहे.
ऊसाचा रस व बी हेवी मोलासेसपासून इथेनॉल निर्मिती ठरणार साखर उद्योगाला वरदान

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

अतिरक्त साखर उत्पादन,जागतिक बाजरपेठेतील साखरेच्या दरातील घसरण आणि एक रकमी एफआरपीच्या चक्रात सापडलेल्या साखर उद्योगाला थेट ऊसाचा रस व बी हेवी मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती वरदान ठरणारे आहे.

ऊसापासून साखर निर्मिती करणे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण भारत देश आणि महाराष्ट्र राज्यातील साखर साखर उद्योगाची वाटचाल सुरू आहे. जो पर्यंत ऊस गळीतास आल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिलीच पाहिजे असा सरकारी बडगा नव्हता तो पर्यंत साखर उत्पादना व्यतिरिक्त अन्य उपपदार्थ निर्मितीकडे फारसे गांभीर्याने कधीच पाहिले गेले नाही.त्यामुळे ऊस गाळप करणे, साखर निर्मिती करणे आणि फार फार तर डिस्टिलरीच्या माध्यमातून अल्कोहोल निर्मित करणे हेच काम आजवर साखर कारखान्यानी केले.त्यामुळे ऊस बिल देणी आणि कामगारांचे पगार वेळेवर करणे ही मुस्किल झालेले आहे.

साखर आणि अल्कोहोल निर्मितीच्या पलीकडे जाऊन सहवीज निर्मिती प्रकल्प,इथेनॉल निर्मिती हे ही उपपदार्थ साखर कारखान्याना आर्थिक स्थैर्य देणारे ठरत आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच इथेनॉलच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ करून थेट उसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या  इथेनॉलचा दर 47.50 प्रति लीटर वरून  59.50 केला आहे तर बी हेव्ही मोलॅसीस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर 47.50 प्रतिलीटर वरून 52.43 केला आहे.

गेल्या इथेनॉल पुरवठा वर्ष 2018-19 मध्ये साखर कारखान्यांनी ऑइल उतपादन कंपन्यांना सुमारे 180 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा तेल कंपन्यांना केले. ज्यामुळे ऑइल कंपन्या 5% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठू शकल्या. इथेनॉलला ऑइल कंपन्यांची  पुरेशी मागणी आहे.केंद्र सरकार इथेनॉलचे दर  ठरवत असल्याने साखर कारखानदारांना अतिरिक्त ऊस व साखर उत्पादन इथेनॉलकडे वळविण्यास  काहीच अडचण उद्भवणार नाही.  इथेनॉलचे उत्पादन करून ऑइल कंपन्याना  ऑइल   पुरवठा झाल्यास केवळ 3 आठवड्यांतच साखर कारखानदारांना पैसा उपलब्ध होतो. मात्र साखर उत्पादन करून साखर विक्रीतून मिळणारा पैसा मिळण्यास 12-15 महिन्यांचा कालावधी लागतो. उसाला इथेनॉलकडे वळविल्यास साखर कारखान्यांचा पैशाचा रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुधारेल आणि उसाच्या थकीत देय रकमा वेळेवर देण्यास त्यांची मदत होईल.ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राज्य सरकारांना साखर कारखानदार आणि डिस्टिलर्स यांच्याशी बैठक घेण्यास सांगितले आहे.  सध्या साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनासाठी स्थापित क्षमता देखील वापरण्यात आलेली नाही.कारखान्यांनी इथॅनॉल तयार करण्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या क्षमतेचा किमान 85% क्षमतेचा वापर करावा असे ही केंद्राने सुचविले आहे.

अलीकडेच केंद्र सरकारने पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे व इथेनॉल होणारे संपूर्ण इथेनॉल खरेदीचा 2030 पर्यंतचा आराखडा तयार केलेला आहे.या आराखड्यानुसार ऑईल कंपन्यांकडून पुढील 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन केले आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी व इंडियन ऑइल कंपनी या तीन कंपन्यांनी 01 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 25 या 5 वर्षात 2555 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन केले आहे.

दि.01 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी ऑइल कंपन्याना इथेनॉल पुरवठा करण्यासाठी पूरवठादारांची दीर्घकालीन  नोंदणी व करार करण्यात येणार आहे.डिसेंबर 20 ते नोव्हेंबर 21या कालावधीत 465 कोटी लिटर, डिसेंबर 21 ते नोव्हेंबर 22 या कालावधीत 470 कोटी लिटर, डिसेंबर 22 ते नोव्हेंबर 23 या कालावधीत 500 कोटी लिटर,डिसेंबर 23 ते नोव्हेंबर 24 या कालावधीत 540 कोटी लिटर आणि डिसेंबर 24 ते नोव्हेंबर 25 या कालावधीत 580 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.

साखर उद्योगातील तज्ञांच्या मते...

पारंपरिक सी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती पेक्षा थेट ऊसाचा रस किंवा बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती करणे साखर उद्योगाला फायदेशीर ठरले. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनाचा प्रश्न ही सुटेल आणि इथेनॉल मुळे शास्वत उत्पादन ही मिळेल.

सी-हेव्ही पेक्षा बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखर कारखान्यांनाचा दैनिक क्षमतेपेक्षा ऊस गाळप ही जास्त होईल,स्टीम(पाण्याची वाफ) कमी लागेल,त्यामुळे इंधन(भुसा) वाचेल,उत्पादीत साखरेची गुणवत्ता वाढेल,पॅन व सेन्ट्रीफ्यूज मशीन कमी लागतील,साखर पॅकिंग करिता लागणारे पोती-गोण्या(बरदाना) कमी लागेल,साखर पोत्यांची पॅकिंग व गोडावून पर्यंतच्या वहातुक खर्चात बचत होईल, साखर साठवणुकीसाठी गोडवूनची समस्यां निर्माण होणार नाही,इथेनॉलचा उतारा वाढेल व अधिकच दर ही मिळेल, या हंगामात सी-हेव्ही मोलासेसचे दर प्रतिटन 3500 रुपयांपेक्षा ही कमी होण्याची भीती आहे त्यामुळे बी-हेव्ही मोलासेस निर्माण केल्यास या मोलासेसला प्रतिटन 10000 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे.

इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सकारात्मक पाऊल...

साखर, साखरेचा पाक, ऊसाचा रस, बी हेवी व सी - हेवी पासून इथेनॉल निर्मिती करुन त्याची आसवनीच्या टाक्यांमध्ये साठवणूक करण्यास तसेच प्रमाणित करुन विक्री करण्याची प्रक्रिया सरकारने सुलभ केलीय आहे.

साखर, साखरेचा पाक, ऊसाचा रस, बी-हेवी व सी-हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन घेणे सुलभ व्हावे यासाठी भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण,अन्न व नागरीपुरवठा मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार आसवनी अनुज्ञप्तीधारकाने त्यांच्या घटकाच्या प्रभारी अधिकारी व संबंधीत अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क यांना साखर, साखरेचा पाक,ऊसाचा रस,बी-हेवी,सी-हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन घेण्याबाबत लेखी कळविल्यानंतर घटकाने साखर, साखरेचा पाक,ऊसाचा रस, बी-हेवी, सी-हेवी मळीपासून जलरहित मद्यार्काचे उत्पादन सुरु करावे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही . तथापि , घटकाने याबाबतची पुर्वकल्पना 10 दिवस अगोदर लेखी स्वरुपात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रभारी अधिका-यास देणे आवश्यक राहील.

केंद्र शासनाने, ज्या साखर कारखान्याकडे आसवनी अथवा पुर्न:उर्ध्वपतन सुविधा उपलब्ध नाही अशा कारखान्यांनी त्यांचे बी-हेवी मळी उर्ध्वपतनासाठी दुस-या आसवनीकडे, इथेनॉलच्या निर्मितीसाठी, हस्तांतरीत करण्याची परवानगी दिल्याने, यापदार्थांची संबंधित आसवनीकडे वाहतुक करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, सदर वाहतूकीपूर्वी क्षेत्रीय राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांचे प्रमाणीकरण आवश्यक राहील व सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रणाली मध्ये आगाऊ नोंद करणे व याबाबत पुर्वकल्पना देणे आवश्यक राहील.साखर कारखाना सी हेवी मळी, बी-हेवी मळी,ऊसाचा रस, साखरेचा पाक याची राज्यांतर्गत वाहतूक आसवनीच्या ठिकाणी करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही . साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या आसवनीने बी-हेवी मळी , ऊसाचा रस , साखरेचा पाक अथवा साखर यापासून उत्पादित केलेल्या विप्रकृत मद्यार्काची जलरहित मद्यार्क निर्मितीची सोय असलेल्या आसवनी, इथेनॉल प्रकल्पाकडे वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे.

मोलासेस मधील साखरेचे प्रमाण (टीआरएस) व प्रतिटन मोलासेस पासून अल्कोहोल निर्मिती याबाबद केंद्र व राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे.

प्रतिटन सी-हेव्ही मोलासेस पासून मद्यार्क निर्मिती...

(अ.नं.--मोलासेस ग्रेड--टीआरएस % ---अल्कोहोल लिटर--- बल्क लिटर---प्रूफ लिटर)

1) ए-ग्रेड--50 टक्के व त्यावर-- 233-- 245--407

2) बी-ग्रेड-- 44 ते 49.9 टक्के---194-- 203-- 338

3) सी-ग्रेड--40 ते 44.9 टक्के-- 150 -- 156 -- 262

प्रतिटन बी-हेव्ही मोलासेस पासून मद्यार्क निर्मिती...

(अ.नं.--मोलासेस ग्रेड--टीआरएस % ---अल्कोहोल लिटर--- बल्क लिटर---प्रूफ लिटर)

1) बी-हेव्ही-1--60 टक्के व त्यावर-- 294-- 308-- 524

2) बी हेव्ही-2-- 55 ते 55.99 टक्के--- 267-- 280 -- 467

ऊसाच्या रसापासून अथवा शुगर सिरप पासून थेट मद्यार्क निर्मितीचा किमान उतारा निश्चित करण्यासाठी साखरेचा किमान उतारा 9.50 % इतका गृहीत धरल्यास, किण्वन व उर्ध्वपातन (फरमेन्टेशन व डिस्टिलेशन) प्रक्रियेची कार्यक्षमता विचारात घेता ऊसाचा रस, साखरेचा पाक पासून , वापरलेल्या प्रतिटन उसाच्या प्रमाणात, मद्यार्काचा किमान उतारा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.

(कच्चा माल---अल्कोहोल लिटर--- बल्क लिटर---प्रूफ लिटर)

ऊसाचा रस/साखर पाक-- 57 -- 60 -- 100

साखरे पासून थेट मद्यार्क निर्मितीचा किमान उतारा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे...

(कच्चा माल---अल्कोहोल लिटर--- बल्क लिटर---प्रूफ लिटर)

साखर पाक-- 255 -- 550 -- 918

वरीलप्रमाणे ऊसाच्या रस , साखरेचा पाक व सायापासून मद्यार्काचा किमान उतारा निश्चित करण्यात येत आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com