
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आज सकाळी दिल्ली (Delhi) येथून जबलपूरला (Jabalpur) निघालेल्या स्पाईसजेट (SpiceJet) विमानात अचानक धूर येऊ लागल्याने विमानाला पुन्हा खाली उतरवण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे दिसून आले...
सुमारे ५००० फूट उंचीवर गेल्यावर या विमानात अचानक धूर येऊ लागला. या विमानात ५० हून अधिक प्रवासी होते, अशी माहिती मिळाली. अचानक धूर येऊ लागल्याने प्रवाशांना सुरुवातीला काय झाले ते समजले नाही.
मात्र धूर वाढल्याने लोकांना श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता. यामुळे विमानात काही काळ गोंधळ उडाला होता. यानंतर हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.