<p>दिल्ली | Delhi </p><p>स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं १८५ बिलियन डॉलरहून अधिक झाली आहे.</p>.<p>टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावल आहे. गुरुवारी ७ जानेवारी २०२१ रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले. याआधी २०१७ सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आले आहे.</p><p>गेल्या १२ महिन्यांचा आढावा घेतल्यास हा काळ एलन मस्क यांच्यासाठी खास ठरला. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक संपत्तीत तब्बल १५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली. आतापर्यंत ही सर्वाधित वेगाने झालेली वाढ ठरत आहे. संपत्तीत झपाट्याने वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजी हे मुख्य कारण आहे.</p>