दिल्ली | Delhi

टेस्लाचे सीईओ आणि सह संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीमध्ये यंदाच्या वर्षात मोठी वाढ झाली आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

श्रीमंतांच्या यादीमध्ये आता त्यांच्यापुढे केवळ अमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस (Jeff Bezos) आहे. २०२०मध्ये जानेवारी महिन्यात जगातल्या ५०० श्रीमंताच्या ब्लूमबर्ग बिलेनयिर्स इंडेक्स मध्ये ३५ व्या स्थानी असणार्या एलन मस्क यांनी दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. आता

एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते. आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.