धरणात बोट उलटली; एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत

धरणात बोट उलटली; एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत

रांची | Ranchi

झारखंडमधून (Jharkhand) एका मोठ्या दुर्घटनेचे वृत्त समोर येत आहे. कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो ब्लॉकमधील धरणात (Dam) बोट उलटली (Boat Capsized) आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्याच्या सीमेवर असेलेल्या मरकच्चो ब्लॉक स्थिडॅम जलाशयात बोटीतून सुमारे १० जण फिरण्यासाठी निघाले.

यावेळी त्यांना घेऊन जाणारी बोट जलाशयात उलटली. यामुळे आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एका सदस्याने पोहत बाहेर येऊन नागरिकांना घटनेची माहिती दिली..

बुडालेले सर्वजण गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार ब्लॉकमधील खेन्तो गावातील असल्याचे समजते. शिवम सिंग (१७), पलक कुमारी (१४), सीताराम यादव (४०), शेजल कुमारी (१६), हर्षल कुमार (८), बऊवा (५), राहुल कुमार (१६), अमित कुमार (१४) अशी मृतांची नावे आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com