मोठा निर्णय! 'या' राज्यांचे राज्यपाल बदलले, राष्ट्रपतींकडून यादी जाहीर

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठा निर्णय
मोठा निर्णय! 'या' राज्यांचे राज्यपाल बदलले, राष्ट्रपतींकडून यादी जाहीर

दिल्ली | Delhi

केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Govt) लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अशातच मोदी सरकारने (Modi govt) मोठा निर्णय घेत ८ राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले आहे. याबाबत राष्ट्रपती भवनाद्वारे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन राज्यपाल नेमले आहेत. यात अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर अनेकांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

हरिभाऊ कंभमपती (Hari Babu Kambhampati) हे मिझोरामचे राज्यपाल (Mizoram Governor) असतील, मंगुभाई छगनभाई पटेल मध्य प्रदेशचे (Mangubhai Chhaganbhai Patel as Governor of Madhya Pradesh), राजेंद्र विश्वनाथ अरलेकर यांना हिमाचल प्रदेशचा राज्यपाल करण्यात आलं आहे (Rajendra Vishwanath Arlekar as Governor of Himachal Pradesh). मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरण पिल्लाई यांना गोव्याच्या राज्यपालपदी (Mizoram Governor PS Sreedharan Pillai appointed as Goa Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या त्रिपुराचे राज्यपाल असतील (Haryana Governor Satyadev Narayan Arya appointed as Tripura Governor). त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस याना झारखंडची (Tripura Governor Ramesh Bais appointed as Jharkhand Governor) जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंदारु दत्तात्रय यांना हरियाचे राज्यपाल करण्यात आले आहे (Himachal Pradesh Governor Bandaru Dattatraya appointed as Haryana Governor). राष्ट्रपती कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com