पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेली (Bareli) येथून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोनचा स्फोट (Mobile Blast) होऊन एका 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, बरेली येथील कुसुम कश्यप (Kusum kashyap) या महिलेने सहा महिन्यांपूर्वीच नवीन फोन विकत घेतला होता. घटनेच्या दिवशी कुसुम यांनी आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Phone Charging) लावला होता.

पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव
IMD : राज्यातील 'या' भागात पावसाचा मुक्काम वाढणार

त्याच्या बाजूलाच त्यांची 8 महिन्यांची मुलगी बेडवर झोपली होती. मोबाईल चार्जिंगला लावून कुसुम किचनमध्ये काम करण्यासाठी निघून गेल्या. काही वेळाने कुसुम यांना स्फोटाचा मोठा आवाज झाला. मुलगी झोपलेली असलेल्या रुमकडे त्यांनी धाव घेतली.

पालकांनो सावधान! मोबाईलने घेतला आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव
फर्निचर उद्योजकाची हत्या : अखेर नाशिकरोडला खुनाचा गुन्हा दाखल

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटात बाजूला झोपेलली चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. त्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com