धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

युरोपियन देश असलेल्या सर्बियामधील (Serbia) बेलग्रेड (Belgrade) येथील एका शाळेत सातवीतील विद्यार्थ्याने अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे...

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू
...तर हे येणारा भविष्यकाळ ठरवेल; पटोलेंच्या 'त्या' टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

याबाबत सर्बियाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला असून यात आठ शाळकरी मुलांसह एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. तर अन्य सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाला झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये बाल्कन युद्धात मध्य सर्बियन गावात अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला होता.

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू
राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही...

दरम्यान, गोळीबार झाल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली असून आरोपीने आपल्या वडिलांच्या बंदुकीने हा गोळीबार केल्याचे समजते. तसेच गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नसून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com