देश-विदेश
KCR यांची मुलगी कविता यांना ED कडून समन्स; काय आहे प्रकरण?
दिल्ली | Delhi
दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam)प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत.
आता या घोटाळ्यात ED नं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कविताला (K Kavita) समन्स पाठवलंय. ED नं ९ मार्चला कविताला चौकशीसाठी बोलावल आहे.
कविता ह्या दक्षिण गटाच्या प्रतिनिधींपैकी एक आहेत. त्यांच्यावर आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
दक्षिण गटाचं प्रतिनिधीत्व अभिषेक बोईनापल्ली, अरुण पिल्लई आणि बुची बाबू यांनी केलं होतं. बोईनापल्ली यांनी नायर आणि त्यांचा सहकारी दिनेश अरोरा यांच्याशी संगनमतानं कट रचून १०० कोटींची लाच हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.