
नवी दिल्ली | New Delhi
दिल्ली एनसीआर, नोएडा आणि गाझियाबाद परिसरात (Delhi NCR, Noida and Ghaziabad Area) आज रविवारी (दि.१५) रोजी दुपारी ४ वाजून ०८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. त्यामुळे दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे....
मागील दोन आठवड्यात दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून हे भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. दिल्लीमध्ये ३.१ रिश्टर स्केल (Richter scale) इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून या भूकंपाचे केंद्रबिंदू हरियाणातील (Haryana) फरीदाबादमध्ये (Faridabad) असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच सध्या या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आलेली नाही.