Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

दिल्ली । Delhi

दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी होती. रात्री उशिरा ९.३४ वाजता हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जातो. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले.

दिल्लीत यापूर्वी १३ जून २०२३ रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी नोंदवण्यात आली होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com