Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन

Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन

मुंबई | Mumbai

एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका पुरुष प्रवाशाने अत्यंत घृणास्पद असे कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर मूत्रविसर्जन केले आहे. ही महिला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती.

Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरला एअर इंडियाचं विमान न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेनं निघालं होतं. त्यावेळी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असलेल्या एका महिलेवर दारुड्या प्रवाशानं मूत्रविसर्जन केलं. त्यावेळी महिलेनं घडलेला सारा प्रकार क्रू मेंबर्सना सांगितला.

परंतु विमान प्रवासात आणि विमान दिल्लीत लँड झाल्यानंतरही आरोपी प्रवाशावर एअर इंडियावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यानं पीडित महिलेनं टाटा ग्रुपचे चेयरमन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आता त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन
Delhi Accident : दिल्लीतल्या घटनेला नवं वळण! ....त्यावेळी एकटी नव्हती अंजली, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

दरम्यान आता विमान वाहतूक नियामक मंडळाने (DGCA) आणि एअर इंडियाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. डीजीसीएने म्हटले की, आम्ही एअरलाइनकडून अहवाल मागवला असून आणि निष्काळजीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com