नवी दिल्ली/अहमदनगर -

अहमदनगरच्या के. के. रेंज येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)

लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केली आहे. एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगरच्या के. के. रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली. नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणार्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

के.के. रेंज येथे लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल, अहमदनगर येथे मंगळवारी जाहीर केले.

या लेझर दिशादर्शक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे, ‘अहमदनगरमधील के.के. रेंज (एसीसी अॅण्ड एस) येथे एमबीटी अर्जुनमधून रणगाडाविरोधी लेझर दिशादर्शक क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन. भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करणार्या डीआरडीओचा देशाला अभिमान आहे.’