महामहिम द्रौपदी मुर्मू विराजमान

महामहिम द्रौपदी मुर्मू विराजमान

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज सोमवारी (दि.25) देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी झाला. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली...

शपथविधीनंतर राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण झाले. यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. या पदाचा मान ठेऊन मी पुढील काळात अत्यंत जलद गतीने काम करणार आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणार आहे. जनतेचे कल्याण हेच माझे लक्ष असेल. देशहिताचे कार्य करणाऱ्या महिला माझा आदर्श आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

दरम्यान, भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत 64 टक्क्यांहून जास्त वैध मते मुर्मू यांनी मिळवली. मुर्मू यांना 6,76,803 तर सिन्हा यांना 3,80,177 मते मिळाली. राष्ट्रपतीपदी विराजमान होणार्‍या त्या दुसर्‍या महिला आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील यांनी देशाचे सर्वोच्चपद भूषवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com