नवी दिल्ली -

फास्टॅग नसेल तर उद्यापासून (15 फेब्रुवारी) चारचाकी वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी

केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू केली आहे. उद्यापासून (15 फेब्रुवारी) या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग प्रणालीला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी ही फास्टॅगसाठी शेवटची तारीख असणार आहे. यापूर्वी फास्टॅगसाठी मुदतवाढ दिली होती. 1 जानेवारीला फास्टॅग लागू करण्यात येणार होते, पण त्याची मुदत वाढून 15 फेब्रुवारी केली होती.

टोल नाक्यावरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतुकी सुरळीत चालू ठेवण्यासाठी देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम फास्टॅग आवश्यक असणार आहे. फास्टॅगचा प्रयोग 80 ते 90 टक्के यशस्वी पार पडला आहे. 10 टक्के शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही सर्व टोल नाक्यावर आणि उतर ठिकाणी फास्टॅग अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ फास्टॅगची खरेदी करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

तर दुप्पट टोल

दरम्यान, तुम्हाला नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी फास्टॅग गरजेचे आहे. फास्टॅग प्रणालीमुळे कॅश ट्रान्झेक्शनाच्या तुलनेत टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ बचत होणार आहे. पण जर फास्टॅग नसेल तर उद्यापासून (15 फेब्रुवारी) तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.