शाळा सुरु करण्यासाठी घाई नको - जागतिक आरोग्य संघटना
देश-विदेश

शाळा सुरु करण्यासाठी घाई नको - जागतिक आरोग्य संघटना

जगभरात करोना संकट अजून गंभीर होणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - जगभरात करोना संकट अजून गंभीर होणार असून शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये, शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी म्हटले आहे. शाळांना राजकारणात आणू नये, कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली आहे.

माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाऊन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com