ट्रम्प यांचे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन

जगभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत
डाेनाल्ड ट्रम्प
डाेनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | Washington -

करोनाला रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी plasma therapy उपयुक्त ठरत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प President Donald Trump यांनी करोनामुक्त झालेल्या रुग्णांना लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी गुरुवारी अमेरिकन रेडक्रॉसच्या मुख्यालयाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

माझे प्रशासन करोना व्हायरसवर उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपण करोनापासून बरे झाले असल्यास, प्लाझ्मा दान करा. जेणेकरून इतरांचे जीव वाचू शकतील. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.

दरम्यान जगभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 46 लाख 29 हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर दीड लाखांहून अधिकांचा करोनामुळे बळी गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com