सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
देश-विदेश

ज्येष्ठांना वेळेत निवृत्ती वेतन द्या

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

देशातील ज्येष्ठांना वेळेत निवृत्तीवेतन द्यावे Pension for senior citizens आणि सर्व वृद्धाश्रमांमध्ये वास्तव्यास असलेल्या वृद्धांना स्वयंसुरक्षा उपकरण (पीपीई), निर्जंतुकीकरण द्रव (सॅनिटाइझर) आणि मुखाच्छादन (मास्क) यासारख्या साहित्याचा तातडीने पुरवठा केला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. Supreme Court of India

करोना संकटाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याने, सर्व राज्य सरकारांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही विनंतीला तत्काळ प्रतिसाद दिला जावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

निवृत्त वेतन हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा आधार असल्याने, ते प्राप्त करताना त्यांची अडवणूक होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या. वृद्धाश्रमातील वृद्धांकडेही लक्ष द्या. करोनाच्या संसर्गापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या साहित्याचा त्वरित पुरवठा करा, असे न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने या प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रख्यात वकील अश्वनी कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे.

देशावर सध्या करोनाचे भीषण संकट आले आहे. मात्र, अनेक वृद्धांना निवृत्ती वेतन वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन जगत आहेत. निवृत्ती वेतन मिळत नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्या दारापर्यंत हा पैसा पोहोचता केला जावा, असे निर्देश देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद उपाध्याय यांनी केला.

यावेळी केंद्र सरकारतर्फे वरिष्ठ वकील व्ही. मोहन म्हणाले, सर्व राज्य सरकारे या दिशेने प्रयत्न करीत असल्याने, केंद्राचे उत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात यावी. यावर उपाध्याय यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा मुद्दा ज्येष्ठांच्या आयुष्याशी संबंधित असल्याने, यावर तातडीने कृती करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com