डिजिटल व्यवहारांमुळे काळ्या पैशात घट - पंतप्रधान मोदी

डिजिटल व्यवहारांमुळे काळ्या पैशात घट  - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली -

वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे देशातील काळ्या पैशात घट झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

म्हटले आहे. नासकॉम टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड लिबरेशन फोरमच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्या काही समूहाने या परिषदेचे आयोजन केले होते.

ते म्हणाले, सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेकडो सरकारी सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत, तंत्रज्ञानामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता आली आहे. पायाभूत सुविधेशी निगडीत अनेक प्रकल्पांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चिन्हीत केले जात आहेत. तसेच यावर ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे. जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण केले जाऊ शकतील. तंत्रज्ञानामुळे मनुष्य दखल कमी केली जात आहे.

करोना संकटात विज्ञान आणि तंत्रज्ञानाता आपले सिद्धत्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. काही काळापूर्वीपर्यंत आपण लसींसाठी इतरांवर अवलंबून असायचो. मात्र, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारताने स्वतःची करोना लस तयार केली आणि अनेक देशांना आपण ती पाठवत आहोत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

आयटी सेक्टरने 4 बिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या कालावधीत लाखों जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. भारताच्या विकासातील एक मजबूत खांब असल्याचे आयटी सेक्टरने दाखवून दिले आहे, आपल्या देशात नवीन कल्पना विकसित करणार्‍या तरुणांची कमतरता नाही. त्यांना आणखी प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याची गरज आहे. देशातील आयटी उद्योगांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा. जागतिक स्तरावर ज्या संधी उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्यांना प्रेरित करायला हवे आणि त्यासाठी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्यही मिळायला हवे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com