भाजपच्या 'दीदी ओ दीदी' टिप्पणीला ममतांचे सडेतोड उत्तर...

भाजपच्या 'दीदी ओ दीदी' टिप्पणीला ममतांचे सडेतोड उत्तर...

तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रचार करतात भाजपकडून 'दीदी ओ दीदी' अशी अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.

मात्र, ममता खचल्या नाहीत, त्यांनी आज या टिप्पणीला साजेसे काम करत भाजपला जोरात चपराकच हाणली आहे. आताच्या आकडेवारीनुसार तृणमूल कॉंग्रेस २०४ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ८६ जागांवर आघाडीवर आहे.

आताच्या आकडेवारीनुसार तृणमूल कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत पश्चिम बंगालमध्ये मिळताना दिसून येत आहे. नंदीग्राममध्ये ममता मागे पडताना दिसून येत होत्या. मात्र, अखेरच्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी ममता भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यावर ८ हजार मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

भाजप पराभवाच्या छायेत दिसत असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार जल्लोष करायला सुरुवात केली होती. मात्र, निवडणूक आयोगाणे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईचे संकेत दिले होते.

दरम्यान, यानंतर तृणमूलकडून जल्लोष साजरी न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना एक ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात 'पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेले हे सडेतोड उत्तर आहे.

दीदी ओ दीदी सोशल मीडियात ट्रेंडीगला

भाजपकडून ममता बनर्जी यांच्याविरोधात प्रचारादरम्यान 'दीदी ओ दीदी' म्हणत टिप्पणी केली. आज प्रत्यक्षात ममता यांनी भाजपला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा फेल केले. यामुळे सध्या ट्विटरला दीदी ओ दीदी ट्रेंडीग असून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत अनेक जुने फोटो यावेळी शेअर झालेले दिसून येत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com