<p>दिल्ली | Delhi</p><p>MDH मसाला कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी (Dharampal Gulati) यांचे आज सकाळी निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.</p>.<p>सकाळी ५.३८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाऱ्याच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गुलाटी यांच्यावर मागील तीन आठवड्यांपासून दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. धर्मपाल गुलाटी हे 'दालाजी' आणि 'महाशयजी' या नावाने ओळखले जात होते. </p>.<p>व्यापार आणि उद्योगात योगदान दिल्याबद्दल गेल्या वर्षी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता. १९४७ मध्ये फाळणीनंतर ते एका टांग्यात दिल्लीत आले होते. येथूनच त्यांनी एका छोट्या दुकानातून व्यवसायाला सुरुवात केली होती.</p>