आज 'धन'त्रयोदशी, जाणून घ्या सोने-चांदीचे दर

आज 'धन'त्रयोदशी, जाणून घ्या सोने-चांदीचे दर

मुंबई | Mumbai

आज 'धन'त्रयोदशी. कुबेर जयंती म्हणून साजरा केल्या जाणार्‍या धनत्रयोदशीला (Dhanatrayodashi) सोनं (Gold) , चांदी (Silver) खरेदी करण्याची प्रथा आहे. भारतामध्ये यंदा दिवाळीत कोविड संक्रमण आटोक्यात असल्याने दिवाळी साजरा करण्याचा उत्साह नागरिकांमध्ये अधिक आहे.

आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold/Silver Price) मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोने ०.१७ टक्क्यांनी घसरले. तर डिसेंबर वायदा चांदीचा भाव ०.२५ टक्क्यांनी घसरला आहे.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,७४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,३२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com