Ranjeet Singh Murder Case : बाबा राम रहीमला CBI न्यायालयाचा मोठा झटका!

Ranjeet Singh Murder Case : बाबा राम रहीमला CBI न्यायालयाचा मोठा झटका!

दिल्ली | Delhi

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला सीबीआय न्यायालयाने (CBI Court) मोठा झटका दिला आहे.

रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात (Ranjeet Singh Murder Case) न्यायालयाने राम रहीम याच्यासह पाच आरोपिंना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने सर्व दोषींची १२ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावणार आहे. (Dera chief Gurmeet Ram Rahim convicted in Ranjit Singh murder case)

आज शुक्रवारी या प्रकरणातील आरोपी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहिम आणि कृष्ण कुमार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर राहिले तर आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल हे प्रत्यक्ष हजर होते. या प्रकरणी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सगळ्या आरोपींना दोषी ठरवलं आहे.

न्यायालयाने या प्रकरणी पहिला निकाल २६ ऑगस्ट रोजी सुनावला होता. सध्या राम रहीम दोन साध्वींवर केलेल्या बलात्कार आणि एका पत्रकाराची हत्या केल्याप्रकरणी हरियाणातील रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

Related Stories

No stories found.