कोविशिल्ड लस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी नाहीत?

कोविशिल्ड लस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी नाहीत?

आयसीएमआरचा खुलासा

नवी दिल्ली / New Delhi - करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ चा एक डोस घेतल्यानंतर 58.1 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta Plus Variant) विरोधात अ‍ॅन्टिबॉडी तयार झाल्या नाहीत तर या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅन्टिबॉडी तयार झाल्या नसल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स अर्थात आयसीएमआरच्या (Indian Council of Medical Research (ICMR)) एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

वेल्लोर येथील ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख असलेले डॉ. टी जेकब यांनी सांगितले, अ‍ॅन्टिबॉडी न दिसणे आणि तयार न होणे या गोष्टी एकच नाहीत. यामध्ये न्यूट्रलायजिंग अ‍ॅन्टिबॉडीचा स्तर हा कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येत नाही. पण अशा अ‍ॅन्टिबॉडी शरीरात असू शकतात आणि त्यामुळे गंभीर लक्षणांपासून संरक्षण होऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com