'ती' चूक जीवावर बेतली! डासांना मारणाऱ्या कॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

आत्महत्या
आत्महत्या

दिल्ली | Delhi

डास मारण्यासाठी किंवा त्यांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी अनेक लोक आपल्या घरांमध्ये कॉईलचा वापर करतात. कॉइलच्या वापराने डासांपासून अल्पावधीतच सुटका मिळू शकते, पण कॉइलचा वापर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचंही अनेकदा सांगितलं जातं.

मात्र, आता या कॉइलने सहा जीव घेतल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीत डासांना पळवून लावणाऱ्या कॉईलच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यू झाला. दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

आत्महत्या
अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

पोलिसांनी आपल्या प्राथमिक तपासानंतर सांगि्तले की, डासांना पळवून लावणारे कॉईल पेटवून कुटुंब झोपी गेले होते. रात्री ती पेटवलेली कॉईल एका गादीवर पडली. त्यामुळे अख्ख्या खोलीत धूर झाला. या धुरामुळे गुदमरून झोपी गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर घरातील दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आत्महत्या
धक्कादायक! ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, पत्नीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या लोकांमध्ये समावेश असून ४ पुरुष १ महिला आणि एक दिड वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. आगीत एका १५ वर्षीय मुलगी आणि ४५ वर्षाच्या व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार हे सुरु आहे.

आत्महत्या
३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com