वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक

आठवडाभर शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना
वायू प्रदूषणामूळे दिल्लीची परिस्थिती धोकादायक

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात वायू प्रदूषणानं उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. वायू प्रदूषणामुळे दिल्ली - एनसीआरमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून १ आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

दरम्यान दिवाळीनंतर दिल्लीत कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळे जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना भेडसावत आहेत.

लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात आले असून तिघामागे एका बालकाला अस्थमा व गंभीर श्वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागणार आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

भारतातील सर्वांत १० प्रदूषित शहरांत उत्तरप्रदेशातील ५ शहरांचा समावेश आहे. जगातील सर्वांत घातक १० प्रदूषित शहरांत दिल्ली ‘टॉप''ला असण्याची लाजिरवाणी परिस्थिती सातत्याने गेली काही वर्षांपासून अनुभवायला मिळते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com