मुंबई -

देशात महिलांविरोधी गुन्ह्यांमध्ये दिल्लीचा पहिला तर मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. तर देशभरातील एकूण गुन्हेगारीत

मुंबईचे स्थान तिसरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग अर्थात एनसीआरबी अहवालाच्या माध्यमातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.

देशातील 19 महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेत सदर अहवाल तयार केला आहे. दुसरीकडे राजधानी दिल्ली याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.

महिलांविरोधी गुन्ह्यांबाबत दिल्लीत 12 हजार 902, मुंबईत सहा हजार 519 आणि नागपुरात एक हजार 144 इतक्या प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच, एकूण गुन्हेगारीमध्ये दिल्लीत 3 लाख 11 हजार 92, चेन्नई महानगरात 71 हजार 949, तर मुंबईमध्ये 60 हजार 823 इतक्या प्रकरणांचा समावेश आहे. दोषसिद्धी दराचे प्रमाण उत्तर प्रदेश 55.2 टक्के, राजस्थान 45 टक्के आणि महाराष्ट्रात 13.7 टक्के इतके आहे.