दिल्लीत प्रदूषणाचा कहर! अनेक भागात AQI ४०० पार, आजपासून शाळा बंद

दिल्लीत प्रदूषणाचा कहर! अनेक भागात AQI ४०० पार, आजपासून शाळा बंद

दिल्ली | Delhi

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदुषण वाढले आहे, आज सकाळी संपूर्ण दिल्लीत मोठ्या प्रमाणात फॉग झाल्याचे दिसायला मिळाले. यामुळे रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास जाणवला. समोरुन येणारी वाहणे दिसत नव्हती.

गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता. त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल रात्री वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गुरुवारी या हंगामात पहिल्यांदाच 'गंभीर' श्रेणीत पोहोचली. येत्या दोन आठवड्यांत प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'प्रदूषणाची वाढती पातळी पाहता दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा पुढील दोन दिवस बंद राहतील. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने एका वेगळ्या आदेशात म्हटले आहे की, त्यांच्या शाळांमधील वर्ग पुढील दोन दिवस चालणार नाहीत.

याआधी दिल्लीत प्रदूषण केव्हा झाले?

सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबर 2023 मधील दिल्लीतील हवेची गुणवत्ता 2020 नंतर सर्वात वाईट होती. हवामान तज्ज्ञांनी पावसाचा अभाव हे त्याचे कारण मानले आहे. दिल्लीला अनेकवेळा प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याची गांभीर्यता लक्षात घेता, दिल्लीतील शाळा पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान सरकारकडून देखील दिल्लीतील प्रदूषण नियंंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात. तर यंदा सरकार यावर कोणत्या उपाययोजना करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com