PHOTO : राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्म पुरस्कार' प्रदान

PHOTO : राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्म पुरस्कार' प्रदान

दिल्ली | Delhi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यांनतर आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती दिली होती.

यावेळी ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये २९ महिलांचा समावेश आहे. तर १६ मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे.

तसेच प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

यादरम्यान माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी हॉकीपटू राणी रामपाल यांना पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित केले.

याशिवाय शास्त्रीय गायक पंडित चन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याशिवाय एअर मार्शल डॉ. पद्म बंडोपाध्याय यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार राणी रामपाल यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Related Stories

No stories found.