पाकिस्तानच्या ISI एजंटला अटक; आर्मी बेसपाशी करत होता भाजी विक्री

पाकिस्तानच्या ISI एजंटला अटक; आर्मी बेसपाशी करत होता भाजी विक्री

दिल्ली l Delhi

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch of Delhi Police) पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची (ISI) हेरगिरी करणाऱ्या एका भाजीविक्रेत्याला अटक केली आहे. हबीब खान असे या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हबीब खान हा राजस्थानमधील (Rajsthan) बीकानेर (Bikaner) जिल्ह्यातील रहिवासी आहे. मंगळवारी त्याला पोखरणमधील (Pokhran) गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मागील काही वर्षांपासून पोखरणमधील लष्करी तळाच्या छावणीत भाजीपाल्याचा पुरवठा करण्याचा त्यांचा ठेका आहे.

हबीबकडून सेनेचे अत्यंत गोपनिय कागदपत्रं आणि लष्करतळाचा नकाशाही जप्त करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, सेनेच्या अधिकाऱ्यांकडून हबीबला ही कागदपत्रं मिळाल्याचं समोर आलंय. आग्र्यात तैनात असलेल्या एका जवानानं हबीबला ही कागदपत्रं मिळवून दिली होती. कमल नावाच्या एका व्यक्तीला ही कागदपत्रं सोपवण्याचं काम आयएसआयकडून हबीबला देण्यात आलं होतं. हबीब खानची चौकशी अद्याप सुरू आहे. त्याच्या चौकशीनंतर आणखीही काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com