Delhi Murder Case : "कुठलाही पश्चाताप नाही, तिला माझ्यासोबत..."; साहिलने दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली

Delhi Murder Case : "कुठलाही पश्चाताप नाही, तिला माझ्यासोबत..."; साहिलने दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये सोमवारी एका 16 वर्षीय मुलीची चाकूने वार केले. एवढ्यावरही मारेकरी थांबला नाही आणि त्याने दगड उचलून मुलीच्या डोक्यात घातला. हत्येची (Murder) घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेच्या दिवशीच दिल्ली पोलिसांनी संशयिताला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली होती. साहिल असे त्याचे नाव आहे...

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) साहिलची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. साहिलने पोलिसांना सांगितले की, ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्याला कुठलाही पश्चाताप नाही.

Delhi Murder Case : "कुठलाही पश्चाताप नाही, तिला माझ्यासोबत..."; साहिलने दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली
IPL 2023 Final : अंतिम सामना जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; पाहा व्हिडीओ...

तो म्हणाला की, मुलगी अनेक दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते यावरून साहिलला खूप राग आला आणि त्याने तरुणीची हत्या केली, असे त्याने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Delhi Murder Case : "कुठलाही पश्चाताप नाही, तिला माझ्यासोबत..."; साहिलने दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली
क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं

हत्येनंतर तो रिठाळा येथे गेला आणि तेथे त्याने खुनात वापरलेला चाकू लपवून ठेवला. यानंतर साहिल बुलंदशहरला गेला. बुलंदशहरला जाण्यासाठी त्यांनी दोनदा बस बदलली. अखेर पोलिसांनी त्याला पकडले.

Delhi Murder Case : "कुठलाही पश्चाताप नाही, तिला माझ्यासोबत..."; साहिलने दिली प्रेयसीच्या हत्येची कबुली
Bus Accident : बस दरीत कोसळून भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, साहिल एकाच वेळी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पीडितेला याबाबत माहिती मिळाली. त्यामुळेच तिने साहिलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यामुळे साहिलने पीडितेला मारण्याचा कट रचल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com