दिल्लीत लॉकडाउन वाढवला; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

करोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे.
दिल्लीत लॉकडाउन वाढवला; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
अरविंद केजरीवाल

दिल्ली | Delhi

देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. देशात करोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

दरम्यान, करोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.

या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राज्य सरकारने १९ एप्रिलला एक आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता. हा लॉकडाऊन उद्या २५ एप्रिलपर्यंत लागू होता. पण तरीही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन एक आठवड्यांसाठी वाढवला आहे. यानुसार येत्या ३ मे पर्यंत नवी दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com