ज्वेलरी शोरुम चोरीचा पोलिसांकडून अखेर उलगडा; दोघांना अटक करत सोनं आणि रोकड केली जप्त

ज्वेलरी शोरुम चोरीचा पोलिसांकडून अखेर उलगडा; दोघांना अटक करत सोनं आणि रोकड केली जप्त

नवी दिल्ली | New Delhi

राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खे ज्वेलरी शोरुम लुटल्याने (Jwellery Showroom was Robbed) खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल २५ कोटींचे सोने लुटले होते. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून (Chattisgrah) तीन चोरांना अटक (Three thief Arrested) केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेले सोनेही सापडले आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.

दिल्लीत जंगपुरा येथे रविवारी एका दागिन्यांच्या शोरूममध्ये २५ कोटी रुपयांची चोरी झाली होती. हे शोरूम उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन यांचे आहे. दरम्यान, छत्तीसगढ पोलिसांनी दुर्ग येथून ७ चोऱ्या करणाऱ्या लोकेश श्रीवास याला स्मृतिनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अटक केली होती.

ज्वेलरी शोरुम चोरीचा पोलिसांकडून अखेर उलगडा; दोघांना अटक करत सोनं आणि रोकड केली जप्त
गुजरातमध्ये तब्बल 'इतक्या' कोटींच्या ड्रग्जचा साठा जप्त; कच्छ किनारपट्टी भागात केली कारवाई

त्याच्या जवळ दिल्ली शोरूममधून चोरी केलेल १८ किलो सोन आणि १२.५० लाख कॅश ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी लोकेशचा दुसरा साथिदार शिवा चंद्रवंशी याला कवर्धा येथून दागिन्यांसोबतच २८ लाखांचा ऐवजासोबत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपिंना अटक करून दिल्लीला घेऊन जात आहेत.

पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेले सोने पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल १८ किलोहून अधिक सोने ठेवण्यात आले होते. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते.

ज्वेलरी शोरुम चोरीचा पोलिसांकडून अखेर उलगडा; दोघांना अटक करत सोनं आणि रोकड केली जप्त
ईदच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 34 ठार, अनेक जखमी

यावेळी, पोलिसांना तपासादरम्यान, जंगपुरामधील ज्वेलरी शॉपच्या चोरीत सहभागी असणारा मास्टरमाइंड दक्षिण भारतातील अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली. राजधानी दिल्लीत झालेली ही चोरी आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी होती.

रविवारी २४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता कर्मचाऱ्यांनी दुकान बंद केले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता शोरुम उघडण्यात आले असता कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. चोरांनी संपूर्ण शोरुमच लुटले होते. चोरांनी फक्त कपाटं आणि शोकेसमधील सोने चोरले नव्हते तर गुप्त ठिकाणी असणाऱ्या रुममध्येही चोरी केली होती. सोने, चांदी यासह महागडे जेम्स स्टोन म्हणजेच हिरेही चोरांनी लुटले होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com