अभिनेत्री जुही चावलाला 20 लाख भरण्यासाठी आठवड्याची मुदत

अभिनेत्री जुही चावलाला 20 लाख भरण्यासाठी आठवड्याची मुदत

नवी दिल्ली / New Delhi - देशात 5 जी तंत्रज्ञानाला एका याचिकेद्वारे विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आणि अन्य दोन जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) 20 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ही रक्कम भरण्यासाठी न्यायालयानेे जुही चावला आणि अन्य दोन जणांना एक आठवड्याची मुदत दिली आहे. ही रक्कम अद्याप न भरल्याबद्दल हायकोर्टाने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांची ही याचिका फाजील स्वरूपाची आहे असा आक्षेप घेत कोर्टाने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई केली होती.

याचिकाकर्त्यांविषयी आम्ही अजूनही मवाळ भूमिका घेत आहोत. त्यांनी 20 लाखांची रक्कम भरल्यानंतर त्यांच्या विरोधातील न्यायालयाची बेअदबी केल्याचा खटला मागे घेण्यात येईल, असेही न्यायालयानेे आज स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी याचिका फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावला यांना चांगलच फटकारलं असून 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही याचिका एक पब्लिसिटी स्टंटसाठी दाखल करण्यात आली होती. त्यामुळेच जुही यांनी सुनवाईची लिंक सोशल मीडियावर शेअर केली होती, असं न्यायालयाने म्हटलं.

तर 5 जी फोन नेटवर्कमुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतील, असा त्यांनी घेतलेला आक्षेप निरर्थक आहे. ही केवळ खोडसाळ मनोवृत्तीतून करण्यात आलेली याचिका आहे असे निरीक्षणही कोर्टाने त्यांच्या बाबतीत आधी नोंदवले आहे. 5 जी नेटवर्कमुळे पृथ्वीवरील मानवासहित सर्वच प्राणिमात्रांना हानी पोहोचेल असे जुही चावला व तिच्या सहकार्‍यांचे म्हणणे होते. असे याचिकेत नमूद केले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com