नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत शेतकर्यांचे गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. आज 122 वा दिवशी

शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमेवर होलिका दहन केले. या होलिका दहनाच्या कार्यक्रमात शेतकर्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या कॉपी जाळल्या

आज टिकरी बॉर्डरवर शेतकर्यांनी होलिका दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यातून केंद्र सरकारला एक प्रतिकात्मक संदेश देण्यात आला आहे.

या वर्षी शेतकरी आंदोलकांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी त्यांनी एकमेकांनी मातीचा टिळा लावण्याचा निर्णय घेतला. तसेच या आंदोलनावेळी ज्यांनी प्राण गमावलो त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, गेल्या चार महिन्यापासून शेतकर्यांचं हे आंदोलन सुरु आहे. या दरम्यान, शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक चर्चेच्या फेर्या पार पडल्या पण अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.

शुक्रवारी शेतकरी आंदोलकांच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याला काहीसा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय. सुरुवातीला या आंदोलनाला जेवढा प्रतिसाद मिळाला होता तेवढा प्रतिसाद या भारत बंदला मिळाला नाही. तरीही हे केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. तर शेतकरी नेते ज्यावेळी ठरवतील त्यावेळी हे आंदोलन संपेल असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवारी सांगितलं आहे.