दिल्ली काँग्रेसने राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याचा केला ठराव

दिल्ली काँग्रेसने राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याचा केला ठराव

नवी दिल्ली -

दिल्ली काँग्रेसने राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी

यांची तत्काळ निवड करावी, असा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, जून 2021 पर्यंत राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल असे काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केले आहे.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले, राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत जे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करु शकतात. शेतकर्‍यांचे प्रश्न ते आजारी पडलेली जीएसटीची व्यवस्था याबाबत त्यांनी वर्तवलेल्या शंका आता खर्‍या ठरत आहेत. त्यांनी त्यांची नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही ठराव मंजुर केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com