
दिल्ली l Delhi
तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
हेलिकॉप्टरमधील १४ अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी गंभीर जखमी आहे. बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सर्व शहीदांचं पार्थिव दिल्ली येथे आणण्यात आले आहेत. सर्वांवर आज दिल्लीतील छावणी परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून अंत्ययात्रेला मोठी जनसमुदाय उपस्थित आहे.