<p><strong>नवी दिल्ली - </strong></p><p>भारतात मागील 24 तासांत 18 हजार 732 नव्या करोना </p>.<p>बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात 24 तासांत 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 2 लाख 78 हजार 690 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 97 लाख 61 हजार 538 जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 21 हजार 430 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.</p>