अयोध्या राम मंदिर
अयोध्या राम मंदिर
देश-विदेश

अयोध्येत दिवाळीची तयारी : दिप प्रज्वललाने शरयू उजळणार

Kundan Rajput

नाशिक | Nashik

देशवासियांचे लक्ष लागून असलेल्या राम मंदिराचे भुमीपुजन बुधवारी (दि.५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे अयोध्या नगरीत उत्साहाचे वातावरण अाहे. अवघी अयोध्या 'राममय' झाली असून तिला आधुनिकतेचा शृंगार व साज चढविण्यात आला आहे. अयोध्येत जणु दिवाळी साजरी होत असल्याचे दृश्य आहे.

देशभरातील मोजक्या लोकांना राम मंदिर भुमीपुजनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत तळ ठोकून अाहे. अयोध्येतील हनुमान गढी, दशरथ महल, जानकी महल, सुग्रीव महल, कनक महल आकर्षक विद्युत रोशनाई उजळुन निघाले आहे. शरयुची स्वच्छता करण्यात आली असून या ठिकाणी तीन लाख दिवे प्रज्वलित केले जाणार आहे. दिव्याच्या प्रकाशात शरयुचे वैभव डोळे दिपवणारे ठरेल.

अयोध्येच्या गल्ली बोळात जय श्री रामचा जयघोष होत आहे. येथील घराच्या भिंतीवर रामायणाचे चित्र रेखाटण्यात आले असून राम, माता सीता व हनुमानाचे चित्र जणु अयोध्यावासियांशी संवाद साधत असावे इतके जिवंत वाटतात.

येथील छावण्या, मठांमध्ये राम नावाचा गजर सुरु आहे. येथील प्रमुख महंतांना व साधुसंतांना भुमिपुजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्या नगरी डोळयात प्राण आणुन भुमीपुजन सोहळ्याची वाट बघत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com