Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; २०० कोटीनंतर आता 'इतक्या' कोटींची मागणी

Mukesh Ambani
Mukesh Ambani

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली असून सदर धमकी ईमेलद्वारे (Email) देण्यात आली आहे. मेलमध्ये ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून ही धमकी पाहता पोलिसांनी (Police) अंबानींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

अंबानी यांना याआधी धमकीचा ईमेल २६ ऑक्टोबरला आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपयांची मागणी (Demand) केली होती. त्यानंतर किंमत वाढवून २०० कोटी रुपये करण्यात आली होती. तसेच पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकी देणाऱ्याने मेलमध्ये म्हटले होते.

Mukesh Ambani
Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंसोबत काय चर्चा झाली? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

यानंतर आता पुन्हा एकदा अंबानी यांना धमकीचा ईमेल आला असून तो मेल अंबानींच्या अधिकृत ईमेल आयडीवर आला आहे. त्यात म्हटले आहे की, "तुमची सुरक्षा (Security) कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक (Arrested) करू शकत नाहीत, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, या मेलनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या घराची सुरक्षा वाढवली आहे. तर गावदेवी पोलिसांनी (Gadevi Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८७ (एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती किंवा गंभीर दुखापत) आणि ५०६ (२) (गुन्हेगारी धमकीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या पोलीस मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Mukesh Ambani
Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा 'लालपरी'ला फटका; अनेक ठिकाणी बससेवा ठप्प

गेल्या वर्षी देखील मिळाली होती धमकी

मुकेश अंबानींसह त्यांच्या कुटुंबीयांना एका अनोळखी फोनवरून गेल्यावर्षी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बिहारमधील (Bihar) दरभंगा येथून धमकीचा कॉल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. त्यावेळी या आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Mukesh Ambani
Nashik Crime News : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक; काय आहे प्रकरण?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com