पुतिन यांचे निकटवर्तीय अलेक्झांडर दुगिन यांच्या हत्येचा कट, कार स्फोटात मुलीचा मृत्यू

पुतिन यांचे निकटवर्तीय अलेक्झांडर दुगिन यांच्या हत्येचा कट, कार स्फोटात मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे निकटवर्तीय राजकीय विश्लेषक अलेक्झांडर दुगिन (Alexander Dugin) यांच्या मुलीच्या गाडीत शनिवारी उशिरा मॉस्कोमध्ये स्फोट झाला...

या स्फोटात दरिया यांचा मृत्यू झाला. मोझायस्कॉय हायवेवर रात्री ९.४५ च्या सुमारास दरिया दुगिनाच्या कारचा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की कार आगीच्या गोळ्यात बदलली.

या कारमध्ये अलेक्झांडर दुगिन बसणार होते मात्र अचानक त्यांनी या गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मिळत आहे. अलेक्झांडर दुगिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे ब्रेन असल्याचे म्हटले जाते. हा अलेक्झांडर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे बोलले जात आहे. अलेक्झांडर हे व्लादिमीर पुतिन यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com